शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पहिल्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे १० हजार मतांनी आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 08:49 AM2019-05-23T08:49:10+5:302019-05-23T08:53:34+5:30
Shirdi Lok Sabha Election Results 2019
शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोेखडे, काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात मुख्य लढत होत आहे. पहिल्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे १० हजार मताने आघाडीवर आहेत़ काँग्रेसच्या मतदारसंघावर गेल्या वेळेस शिवसेनेने कब्जा केला होता.
शिवसेना हा गड कायम राखील की काँग्रेसच्या हातातून गेलेला गड परत मिळविले का ? याबाबत उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला टपाली मत मोजणीने सुरुवात झाली. त्यानंतर फेरीनिहाय मतमोजणी सुरु करण्यात आली. पहिल्या फेरीअखेर शिर्डीमध्ये लोखंडे यांनी १० हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५४ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५ लाख ३२ हजार ५७७ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ लाख ३२ हजार ७१२ मतं मिळाली होती.