शिर्डीसाठी लागणार दोन बॅलेट मशिन, कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 04:37 PM2019-04-14T16:37:23+5:302019-04-14T16:40:14+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात २० उमेदवार उरले आहेत.
शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात २० उमेदवार उरले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट मशीन लागणार आहेत.
3० जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले
02 जणांचे अर्ज अवैध ठरले
08 जणांनी माघार घेतली
20 उमेदवार रिंगणात आहेत़
एका बॅलेट मशिनवर किती नावे
एका बॅलेट युनिट मशिनवर १५ उमेदवार आणि एक नोटा अशा प्रकारे सोळा उमेदवारांची नावे बसू शकतात.
एक मशिन की जास्त, कसे ठरते?
एखाद्या मतदार संघाच्या निवडणूक आखाड्यात पंधरापेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक विभागाला प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्राची सोय करावी लागते.
1703 केंद्रांवर शिर्डीत मतदान होणार आहे़ प्रत्येक मतदान केंद्रावर एक कंट्रोल युनिट मशिन व उमेदवारांची संख्या २० असल्याने एकूण ३४०६ बॅलेट युनिटची व्यवस्था करावी लागेल.
२०१४ मध्ये होते १४ उमेदवार...
२०१४ मध्ये झालेल्या शिर्डी लोकसभेच्या निवडणूक आखाड्यात सुमारे १४ उमेदवार होते. त्यामुळे निवडणूक विभागाला प्रत्येक केंद्रावर केवळ एकाच मशीनची सोय करावी लागली होती. त्याआधी २००९ मध्ये मात्र १७ उमेदवार असल्याने प्रत्येक केंद्रावर दोन मशीन होते.
१० टक्के राखीव मशीन...
मतदानावेळी एखाद्या मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास तातडीने दुसरी मशीन उपलब्ध करता यावी, यासाठी १० टक्के म्हणजेच ४०० पर्यायी ‘इव्हीएम’ मशीन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्र
अकोले ३०७
संगमनेर २७८
शिर्डी २७०
कोपरगाव २६९
श्रीरामपूर ३१०
नेवासा २६९
मतदान कधी
अहमदनगर मतदारसंघात निवडणूक तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे़