अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिला विजय; राधाकृष्ण विखे पाटील यांनी गड राखला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:01 PM2024-11-23T12:01:24+5:302024-11-23T12:02:11+5:30

Shirdi Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिला विजय हाती आला आहे. शिर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयी गुलाल उधाळला आहे.

Shirdi vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live radhakrisha vikhe patil won | अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिला विजय; राधाकृष्ण विखे पाटील यांनी गड राखला

अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिला विजय; राधाकृष्ण विखे पाटील यांनी गड राखला

Shirdi Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर हाती आला आहे. भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे पराभूत झाल्या. शिर्डी विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच विखे पाटील आघाडीवर होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग आठव्यांदा शिर्डी मतदारसंघातून विजयी होण्याची किमया साधली आहे.

यावेळीही भाजपकडून पुन्हा राधाकृष्ण विखे पाटलांनाच रिंगणात उतरवण्यात आले होते. तर विखे पाटील यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचे आव्हान होते.

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता १९९५ पासून विखे पाटील घराण्याचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. विखे पाटील घराणे हे विठ्ठलराव विखे पाटलांपासून सहकार क्षेत्रात सक्रीय असलेले घराणे. त्यामुळे या घराण्याचे नगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. याच्या जोरावरच राधाकृष्ण विखे पाटील ११९५ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून ते आतापर्यंत पण २०१९ च्या निवडणूक काळात विखे पाटलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले आणि निवडूनही आले. विखे पाटील भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना आपला गड राखता येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट

अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

 

Web Title: Shirdi vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live radhakrisha vikhe patil won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.