शिर्डी नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 03:18 PM2019-06-27T15:18:51+5:302019-06-27T15:19:00+5:30

शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन यांची बिनविरोध झाली. याबाबत अधिकृत घोषणा सायंकाळी होणार आहे.

Shirdi will be the head of the city while Archana will be the president while Mangesh Tribhuvan as the vice president | शिर्डी नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन

शिर्डी नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन

शिर्डी : शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन यांची बिनविरोध झाली. याबाबत अधिकृत घोषणा सायंकाळी होणार आहे.
अध्यक्ष पदासाठी अभय शेळके पाटील, जगन्नाथ गोंदकर व अर्चना कोते यांनी अर्ज दाखल केले होते. तिघेही विखेंचे कट्टर समर्थक होते.
अखेर आज गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर अध्यक्षपदी अर्चना उत्तमराव कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश वामन त्रिभुवन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय कोते, रवी गोंदकर, शिवसेनेचे विजय जगताप, माजी अध्यक्ष अलका शेजवळ, मावळते उपाध्यक्ष सुजित गोंदकर, अ‍ॅड अनिल शेजवळ, पोपट शिंदे, नितीन कोते, नितीन शेजवळ, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, हरीचंद्र कोते, कविता सुनील निकम उपस्थित होते.
नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज सायंकाळी निवडणूक होणार आहे. सायंकाळच्या बैठकीत औपचारिक घोषणा होईल.

Web Title: Shirdi will be the head of the city while Archana will be the president while Mangesh Tribhuvan as the vice president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.