शिर्डी लोकसभेबाबत पक्षाध्यक्षांशी चर्चा करणार : जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:57 PM2019-02-21T17:57:08+5:302019-02-21T17:57:18+5:30

कॉँग्रेस व पीपल्स रिपब्लीकन पक्षाची आघाडी असल्याने शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी पक्षाध्यक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती राष्टÑीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली.

Shirdi will talk to the President of the Lok Sabha about: Jogendra Kawade | शिर्डी लोकसभेबाबत पक्षाध्यक्षांशी चर्चा करणार : जोगेंद्र कवाडे

शिर्डी लोकसभेबाबत पक्षाध्यक्षांशी चर्चा करणार : जोगेंद्र कवाडे

शिर्डी : कॉँग्रेस व पीपल्स रिपब्लीकन पक्षाची आघाडी असल्याने शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी पक्षाध्यक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती राष्टÑीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली.
राहाता तालुक्यातील निमगाव येथे कवाडे यांनी धावती भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले. कवाडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शिर्डी लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जगताप होते. विजय जगताप यांनी पक्ष विस्तारासाठी तालुका पातळीवर बैठका घेण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश उनवणे, शशिकांत उनवणे, उपसरपंच अजय जगताप, सुनील क्षेत्रे, सुनील गांगुर्डे, जयंत गायकवाड, मधुकर पावसे, अ‍ॅड. बाबासाहेब ब्राम्हणे, वसंत नन्नवरे, मोगल बनसोडे, नानासाहेब सातपुते, रमेश कसबे, सुनील जगताप, एकनाथ कोळगे, रवींद्र जगताप, पप्पू जगताप, सिध्दार्थ जगताप आदी उपस्थित होते.

 

Web Title: Shirdi will talk to the President of the Lok Sabha about: Jogendra Kawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.