शिर्डीत पतीने पत्नीला चाकूने भोसकून स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:06 AM2020-04-20T10:06:13+5:302020-04-20T11:04:53+5:30
शिर्डी -शिर्डीत पती-पत्नीच्या वादात पतीने पत्नीला चाकूने भोसकून व स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले , जखमी महिलेला जवळ पास राहणाऱ्या रहिवाशांनी श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले.या ठिकाणी उपचार करण्यात आले.यात पत्नीचे प्राण वाचले आहे.गेल्या काही दिवसापासून लॉक डाऊन मुळे सर्वत्र शांतता वाटत असताना हा प्रकार शिर्डीत घडल्याने खळबळ माजली आहे

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथील संभाजीनगर भागात राहणारे कैलास दिवाकर ठोकळ वय 50 वर्षे व अनिता कैलास ठोकळ वय 45 वर्ष या पती पत्नीत दि 17 एप्रिल रोजी रात्री कैलास व पत्नी अनिता दोघांत भांडण झाले. या भांडणात वाद विकोपाला गेला
कैलासने रागाच्या भरात चाकूने आपली पत्नी अनिता ठोकळ यांचेवर चाकूने वार केले, चाकू लागल्याने अनिता जबर जखमी झाली, व खाली पडली, हे पाहताच स्वतः कैलास ठोकळ याने दोरीने आपला गळफास घेत जीवन संपविले पत्नी मात्र जबर जखमी झाल्याने व मुलाने चंद्रकांतने आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा होऊन या जखमी महिलेला शिर्डीचे श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले.ठोकळ पती पत्नीत नेहमी वाद होत असत. संशयावरून पतीने चाकूने वार करत त्यांना मारून स्वतः ही जीवन यात्रा संपविण्याचा विचार केला असावा असे चर्चिले जात आहे,सुदैवाने पत्नीचे प्राण वाचले आहे.याबाबत शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास केला जात आहे