पोलिसांवरील हल्ल्याचा शिवराष्ट्र सेनेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:12+5:302021-05-09T04:22:12+5:30
अहमदनगर : शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने संगमनेरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ...
अहमदनगर : शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने संगमनेरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेरमध्ये पोलिसांवर काही जमावाने अत्यंत निर्दयीपणे हल्ला केला आहे. पोलीस कोरोनाच्या संकटकाळात देवदूताची भूमिका बजावत आहेत. मंत्र्यांच्याच तालुक्यात पोलिसांवर हल्ले होणे शरमेची बाब आहे. जे पोलीस आपल्या कुटुंबापासून लांब राहून कोरोना महामारीत इतर कुटुंबीयांच्या रक्षणासाठी झटत आहेत. कोरोनाने अनेक पोलीस बाधित झाले आहेत. अनेकांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
या प्रकरणात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, लोकप्रतिनिधी असलेल्या थोरात कुटुंबीयांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पोलिसांची जाहीर माफी मागावी.
-
फोटो-०८ शिवराष्ट्र सेना