शिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाका फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:31 PM2018-04-23T12:31:36+5:302018-04-23T12:33:33+5:30
हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली.
संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेरनजिकचा हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली.
सोमवारी सकाळी शिवसैनिक मोठ्या संख्येने हिवरगाव पावसा येथील खेड-सिन्नर एक्प्रेस वे लिमिटेड कंपनीच्या टोलनाक्यावर आले. एम. एच. १७ पासिंग असलेल्या सर्व चारचाकी वाहनांना टोलमुक्त करावे, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी टोल नाक्यावर आंदोलन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड सुरु केली. तसेच टोल व्यवस्थापनाकडून लावलेले बॅरेकेटस् तोडले व सर्व वाहनांसाठी रस्ता खुला केला. पोलिसांसमोरच शिवसैनिकांची ही टोलफोड सुरु होती. मात्र, पोलिसांनी कोणालाही मज्जाव केला नाही. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संगमनेर तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, अप्पासाहेब केतेकर, सोमनाथ कानकाटे, अशोक सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.