शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांनी दिला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:48 AM2018-05-24T10:48:19+5:302018-05-24T13:02:34+5:30
शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्याकडे आज सोपविला आहे.
अहमदनगर : शिवसेनेच्या नगरसेविका शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्याकडे आज सोपविला आहे. नगरसेविका शारदा ढवण यांचे पती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिगंबर ढवण यांची पदावरुन दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा़ शशिकांत गाडे यांनी हकालपट्टी केली होती.
ढवण यांनी मांडलेला प्रश्न योग्य असला तरी महापौरांच्या दालनातील त्यांनी घातलेला गोंधळ अयोग्य होता. त्याचा तपशील मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहे. दरम्यान महापालिकेत निधीची कमतरता असल्याने नगरसेवकांमध्ये वाद असले तरी शिवसेनेत कोणत्याही प्रकारची दुफळी नसल्याचे नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केले. सेनेचे उपजिल्हाप्रमुख ढवण यांच्या महापौर दालनातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांची हॉटेल यश पॅलेसवर बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीला संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांच्यासह सर्वच्या सर्व २० नगरसेवक उपस्थित होते. यावेळी ढवण यांनी केलेल्या आंदोलनाबाबत कोरगावकर यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना समज दिली. तसेच त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले. महापौर सुरेखा कदम, माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्याबाबत काही नगरसेवकांची नाराजी असू शकते. त्यानंतर काही तासांतच दिगंबर ढवण यांच्या पत्नी नगरसेविका शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.