केंद्रीय मंत्री राणेंवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:26 AM2021-08-25T04:26:18+5:302021-08-25T04:26:18+5:30
यावेळी शिवसेनेच्या एका गटाने राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून शहरात राणेंच्या ...
यावेळी शिवसेनेच्या एका गटाने राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून शहरात राणेंच्या निषेधाचा फलक लावला, तर दुसऱ्या गटाने शहरातील भाजी मार्केटजवळील स्वच्छतागृहवर राणे यांचे नाव असलेले फलक लावून आंदोलन केले.
यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, शहर प्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, बाळासाहेब जाधव, असलम शेख, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष इरफान शेख, महिला आघाडीच्या सपना मोरे, विमल पुंड, राहुल देशपांडे, विकास शर्मा, योगेश मोरे, बाळू साळुंके, अमजद शेख, अविनाश धोक्रत, वैभव हलवाई, तर दुसऱ्या गटाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, नगरसेवक अनिल आव्हाड, सनी वाघ, पप्पू पडियार, रवींद्र कथले, गणेश जाधव, सोमनाथ लोहकरे, सिद्धार्थ शेळके, अल्ताफ शेख, नितीश बोरुडे, सागर परदेशी, विजय भोकरे, ऋषीकेश धुमाळ यांच्यासह शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.....................
फोटोओळी -
शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध म्हणून कोपरगावात सार्वजनिक स्वच्छतागृहासह निषेधाचा फलक लावला होता.
----------
फोटो२४- निषेध फलक - कोपरगाव