नगर शहरातील खड्ड्यावरून शिवसेना तापली, पायी चालवत आयुक्तांना दाखवले खड्डे;महापौरांना काळे फासण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 02:14 PM2020-09-22T14:14:13+5:302020-09-22T14:15:08+5:30
अहमदनगर: शहरातील खड्ड्यावरून शिवसेना चांगलीच तापली आहे. शहरातील खड्डे बघणूयासाठी शिवसेनेने चक्क् आयुक्तांनी निमंत्रण दिले होते. आयुक्तांना पायी चालवत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आयुक्तांना खड्डे दाखवले. काही खड्ड्यामध्ये फुले- हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
शहराबाहेरील रस्त्याबाबत महापौरांनी अधिका-यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. मात्र शहरातील रस्ते खरास झाले आहेत. आट दिवसात रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर महापौरांनाच काळे फासण्याचा इशारा यावेळी दत्ता जाधव यांनी दिला.