जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:32+5:302021-02-12T04:19:32+5:30

अहमदनगर : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी पूर्वनियोजित दौरा होता. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ...

Shiv Sena's arch at the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान

जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान

अहमदनगर : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी पूर्वनियोजित दौरा होता. त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेने कमान लावली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरही शिवसेनेने फलक लावले आहेत. त्यांना असे फलक लावण्यासाठी कोणी परवानगी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री शिंदे यांचा गुरुवारी नियोजित दौरा होता. नगरपालिका आणि महापालिकेच्या कामाकाजाशी संबंधित ते बैठका घेणार होते. मात्र, त्यांचा गुरुवारचा दौरा रद्द झाला असून ते आता शुक्रवारी येणार आहेत. दरम्यान, मंत्री शिंदे येणार असल्याने शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कमानीवरच शिंदे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. एरवी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यास, फलक लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही प्रशासकीय इमारतीवरच फलक लावल्याने आश्चर्य व्यक्त झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरही चकाचक करण्यात आला होता. जिल्हाधिकारी हेच सध्या महापालिकेचे प्रभारी आयुक्त आहेत. त्यामुळे हे फलक हटविणार का ? याकडे लक्ष लागले आहे. शासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर असे फलक लावण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या भिंतीवरही असे फलक झळकले आहेत. शिवाय फलक लावण्यासाठी शिवसेनेची चढाओढ लागलेली आहे. जागा निश्चित करण्यासाठी आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी हे फलक लावण्यात व्यस्त आहेत.

जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या हेलिपॉडवर मंत्री शिंदे यांचे आगमन होणार असल्याने पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरही फलक लावण्यात आले असून या फलकांवर महापालिका कारवाई करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

--

फोटो- ११ कमान

Web Title: Shiv Sena's arch at the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.