गुन्हा रद्द होण्यासाठी शिवसेनेची खंडपीठात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 08:05 PM2018-04-20T20:05:11+5:302018-04-20T20:06:24+5:30
दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेने औरंगाबाद खंडपीठात गुरूवारी अर्ज केला आहे. या अर्जावर निर्णय होईपर्यंत शिवसैनिकांना अटक करू नये, अशा मागणीचा अर्ज पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.
अहमदनगर: दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेने औरंगाबाद खंडपीठात गुरूवारी अर्ज केला आहे. या अर्जावर निर्णय होईपर्यंत शिवसैनिकांना अटक करू नये, अशा मागणीचा अर्ज पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.
केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली़ या घटनेनंतर केडगाव येथे तोडफोड झाली, पोलीस वाहने, घरांवर दगडफेक झाली़ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली. या प्रकरणी सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे नेते, पदाधिकाºयांसह ६०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस शिवसैनिकांनाही कधीही अटक करू शकतात. ही अटक टळावी, यासाठी सेनेच्यावतीने अॅड एन. बी़ नरवडे यांच्यामार्फत खंठपीठात गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारा अर्ज देण्यात आला आहे.