इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:18 AM2021-02-07T04:18:51+5:302021-02-07T04:18:51+5:30
कोपरगाव : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दरात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी व गोरगरीब जनता महागाईच्या ...
कोपरगाव : केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दरात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी व गोरगरीब जनता महागाईच्या भडक्यात तडफडत आहे. कोरोना महामारीमुळे व्यवसायिक, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात कोपरगावात शिवसेनेने आक्रमक होत जनआंदोलन केले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन दिले.
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य जनता अजून अडचणीत सापडली असून केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावे अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,ज्येष्ठ शिवसैनिक कुक्कूशेठ सहानी, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विधानसभा संघटक असलम शेख, एसटी कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ, बाळासाहेब जाधव, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, युवानेते विक्रांत झावरे, उपशहरप्रमुख विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गगन हाडा, गोपाळ वैरागळ, आकाश कानडे, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, विभाग प्रमुख रफिक शेख, मयूर दळवी, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, दत्तात्रय झावरे, अंबादास वाघ, विशाल झावरे, विजय सोनवणे, सचिन आसने, अक्षय नन्नवरे, अशोक कानडे, वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख पप्पू पेकळे, उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट, शहरप्रमुख जाफर सय्यद, उपशहरप्रमुख राकेश वाघ, प्रवीण शेलार, किरण अडांगळे, पिनू सावतडकर, वैभव हलवाई, श्रीपाद भसाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, उपतालुकाप्रमुख सारिका कुहिरे, शहरप्रमुख राखी विसपुते, उपशहरप्रमुख अश्विनी होने, शितल चव्हाण, अक्षता आमले, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे, सतीश शिंगाणे, चंद्रहंस पाबळे, सतीश लोळगे उपस्थित होते.