शिवा ट्रस्ट महाविद्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:36+5:302021-07-01T04:15:36+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक योगा दिन साजरा करण्यात ...
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योगतज्ज्ञ डॉ. सुचिता भट्टड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. भट्टड म्हणाल्या, योग साधना करणे हे जीवनशैलीत गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी व शरीरातील ऑक्सिजन पातळी नियमित राखण्यासाठी योगा व व्यायाम केलाच पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.
शिवा ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार तसेच शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुल वडाळा महादेव येथील प्रशासकीय अधिकारी किशोर जाधव, शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. शकील सौदागर यांनी योगाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिवा ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे आरोग्यासाठी योग साधनेची गरज आहे, त्याचप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाला आळा घालण्यासाठी वृक्षरोपणाचीही आवश्यकता आहे. प्रत्येकाने वृक्ष लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प जागतिक योगदिनानिमित्त करावा.
जागतिक योगदिनाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला व भगीरासनाच्या मंत्रोच्चाराने सांगता झाली. सहसमन्वयक डॉ. सारिका घेर्डे, डॉ. दर्शनी साबळे, डॉ. अभय पानसंबळ, डॉ. अरुण फरगडे, डॉ. महेजाबीन शेख यांनी काम पाहिले.
--------------