राहरीतून पुन्हा शिवाजी कर्डिलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 02:46 PM2019-10-01T14:46:07+5:302019-10-01T14:46:38+5:30
राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे़ सोशलन मिडियावर कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले होते़ परंतु, भाजपच्या पहिल्याच यादीत कर्डिले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे़
अहमदनगर: राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे़ सोशलन मिडियावर कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले होते़ परंतु, भाजपच्या पहिल्याच यादीत कर्डिले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे़
गतवेळी राहुरीतून शिवाजीराव कर्डिले भाजपच्याच चिन्हावर उभे होते़ लोकसभा निवडणूकीच्यावेळी विखे पिता- पुत्रांना भाजपात आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली़ भाजपचे सत्यजित कदम हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते़ उषाताई तनपुरे यांनी गतवेळी शिवसेनेकडून उमेदवारी केली होती़ त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ पुन्हा मागेल कि काय अशी चर्चा होती़ शिवसेनेला जिल्ह्यातील १२ पैकी ३ जागांवर समाधान मानावे लागले़ त्यामुळे राहुरी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल, यार्चेने मध्यंतरी जोर धरला होता़ त्यात कदम यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते़ त्यामुळे कर्डिले यांचा हक्काचा मतदारसंघ सेनेकडे जाणार असल्याचीही चर्चा होती़ परंतु, भाजपने कर्डिले यांनाच पुन्हा संधी दिल्याने कदम यांच्याही उमेदवारीची शक्यता मावळली आहे़