शिवदुर्ग मोहिमेस भातोडीतून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:14+5:302021-02-16T04:21:14+5:30
केडगाव : मराठा सेवा संघ पाथर्डी तालुका यांच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवदुर्ग अभिवादन मोहीम (पाच दिवस पाच किल्ले) ...
केडगाव : मराठा सेवा संघ पाथर्डी तालुका यांच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवदुर्ग अभिवादन मोहीम (पाच दिवस पाच किल्ले) राबविण्यात आली आहे.
पाथर्डी येथे शिवदुर्ग रथ पूजन करण्यात आले असून, नगर तालुक्यातील शौर्यभूमी असलेल्या भातोडी येथील शूरवीर शरीफजीराजे भोसलेंच्या समाधीस अभिवादन करण्यात आले.
शहाजीराजांचे बंधू छत्रपती शिवरायांचे चुलते जे ३१ ऑक्टोबर, १६२४च्या प्रसिद्ध भातोडीच्या लढाईत शहाजीराजांच्या नेतृत्वात लढताना शहीद झाले. त्यानंतर किल्ले पेमगिरी १६३२ ते १६३६ शहाजीराजांनी नामधारी निजामशाहीच्या नावाखाली स्वतंत्र स्वराज्याची निर्मितीचा पहिला प्रयत्न केला होता. तेथे हा शिवदुर्ग रथ गेला. त्यानंतर, १३ फेब्रुवारीला रात्री सिन्नर येथे मुक्काम करून विश्रांतगड माहुली येथे गेले. १४ फेब्रुवारी रोजी किल्ले माहुली इगतपुरी येथे भेट देऊन त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम करण्यात आला. १५ फेब्रुवारीला किल्ले हरिहर नाशिक येथे मुक्काम केला जाणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी किल्ले रामशेज येथे भेट देऊन पाथर्डी येथे मोहिमेची सांगता होणार आहे.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनावळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. या मोहिमेचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. या मोहिमेसाठी भातोडी गावातूनही बंडू गायकवाड, विक्रम गायकवाड, घनश्याम राऊत, भाऊसाहेब धलपे आदींचे सहकार्य मिळत आहे.
फोटो : १५ शिवदुर्ग
भातोडी येथे शिवदुर्ग रथ पूजन करण्यात आले.