सावेडीतील शिवनगर परिसर कंटेनमेंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:18+5:302021-05-05T04:35:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावेडी उपनगरातील शिवनगर परिसरात महापालिकेने मंगळवारी कंटेनमेंट झोन केला असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सावेडी उपनगरातील शिवनगर परिसरात महापालिकेने मंगळवारी कंटेनमेंट झोन केला असून, हा परिसर बांधकाम विभागाने पत्रे लावून बंद केला आहे.
नगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनासाठी साखळी तोडण्यासाठी महापालिकेने शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. ज्या भागात पाच किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळतील, असा भाग कंटेनमेंट करण्याची कार्यवाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी मागील एप्रिल महिन्यात केडगाव, नागापूर, बोल्हेगाव, सारसनगर, गुलमोहर रोड, सिव्हिल हडको आदी भाग कंटेनमेंट झोन करण्यात आले होते. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्याने कंटेनमेंट करणे बंद झाले होते. परंतु, रुग्णसंख्या वाढल्याने महापालिकेने कंटनमेंट करण्यास सुरुवात केली असून, आणखी काही भाग कंटेनमेंट केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
....