शिवसैनिकांना अखेर भरली धास्ती, धरपकड सुरू, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:24 PM2018-05-09T21:24:27+5:302018-05-09T21:25:02+5:30

दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक करणाºया शिवसैनिकांची अखेर महिनाभरानंतर धरपकड सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांच्या समोर उजळ माथ्याने फिरणारे शिवसैनिक बुधवारपासून शहरातून अचानक गायब झाले आहेत.

Shivsainik's sudden death threat, activists escaped with office bearers | शिवसैनिकांना अखेर भरली धास्ती, धरपकड सुरू, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते फरार

शिवसैनिकांना अखेर भरली धास्ती, धरपकड सुरू, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते फरार

अहमदनगर : दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक करणाºया शिवसैनिकांची अखेर महिनाभरानंतर धरपकड सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांच्या समोर उजळ माथ्याने फिरणारे शिवसैनिक बुधवारपासून शहरातून अचानक गायब झाले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी नगरसेवक सचिन जाधवसह पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
केडगाव दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ६०० शिवसैनिकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून पोलीस शिवसैनिकांना अटक करत नव्हते. त्यातच पोलिसांनी या गुन्'ातील कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वगळले. त्यामुळे गुन्'ातील गांभीर्य आणखी कमी झाले. परिणामी दि. ७ मे रोजी नगरसेवक योगिराज गाडे यांच्यासह ९ शिवसैनिक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांत हजर होऊन लगेच जामीन मिळेल अशी आशा शिवसैनिकांना होती. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे इतर शिवसैनिकही धास्तावले.
बुधवारी मात्र कोतवाली पोलिसांऐवजी एलसीबीच्या (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाने शिवसैनिकांच्या धरपकडीसाठी विशेष मोहीम राबवली. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या टीम रवाना केल्या. त्यात नगरसेवक सचिन तुकाराम जाधव (वय ३८), दिपक सर्जेराव कावळे (२९), अशोक शामराव दहिफळे (वय ५७), रावसाहेब नारायण भाकरे (वय ४९), दीपक शंकरराव धेंड (वय ६१) अशा पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना कोतवाली पोलिसांकडे वर्ग करून गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असताना शिवसैनिकांबाबत घेतलेली मवाळ भूमिका शहरात चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादीसह प्रसारमाध्यमांतूनही पोलिसांवर या संदर्भात टीका झाली. त्यानंतर मात्र शिवसैनिकांच्या धरपकड मोहिमेला गती आली. त्याचाच एक भाग म्हणून थेट एलसीबीने मैदानात उतरून शिवसैनिकांना ताब्यात घेतले. दुपारपर्यंत पाचजण सापडले. शिवसैनिकांना अटक होत असल्याची बातमी शहरात वेगाने पसरल्यानंतर मात्र बरेसचे शिवसैनिक शहरातून गायब झाले. एलसीबीेच्या टीम शिवसैनिकांच्या मागावर असून रात्रीतूनही काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.

गाडेंसह नऊजणांचा मुक्काम वाढला
दरम्यान, सोमवारी अटक केलेल्या नगरसेवक योगिराज गाडे, रावजी नांगरे, प्रफुल्ल साळुंके, गिरीष शर्मा, सुनील वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रय नागापुरे, राजेश सातपुते या नऊ शिवसैनिकांची दोन दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

 

Web Title: Shivsainik's sudden death threat, activists escaped with office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.