'शिवसेना भाजपाची 'प्रेयसी', प्रेयसीचं भांडण कधी चांगलं तर कधी बिघडलेलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 07:55 PM2019-01-31T19:55:24+5:302019-01-31T22:47:51+5:30
पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांबद्दल भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसकडून आम्हाला 12 जागा हव्या आहेत.
मुंबई - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनाभाजपा युतीवरुन शिवसेनेला टोला लागवला आहे. शिवसेना ही भाजपाची प्रेयसी असल्यामुळे हे संबंध तुटत नाहीत. प्रेयसीचं भांडण हे कधी चांगल तर कधी बिघडलेलं असतं, असे म्हणत शिवसेना-भाजपा युती होईल, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तर, युती झाल्यास त्याचा फायदा आम्हालाच होईल, असेही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकरांचा राज्यभर दौरा सुरू आहे. गुरुवारी अहमदनगरमधील शिर्डी येथे
पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकांबद्दल भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसकडून आम्हाला 12 जागा हव्या आहेत. जर, काँग्रेसने 12 जागा दिल्या तर आम्ही महाआघाडीसोबत जाऊ, अन्यथा 48 जागांवर उमेदवार उभे करू, असेही आंबेडकर यांनी म्हटलंय. शरद पवार हे पुरोगामी असले तरी त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संभाजी भिडे चालवत असल्याचा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केलाय. त्यामुळे आघाडी झाल्यास आम्ही केवळ काँग्रेसचा प्रचार करू, राष्ट्रवादीचा प्रचार काँग्रेस करेल, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
भाजपा-शिवसेना युतीबाबत बोलताना, भाजपा आणि शिवसेनेला त्यांनी प्रियकर आणि प्रेयसीची उमपा दिलीय. शिवसेना ही भाजपाची प्रेयसी असून ते भांडण कधी लाडाच तर कधी बिघडलेलं असतं. त्यामुळे दोघांची युती होईलच, असे संकेतही त्यांनी दिले. मात्र, सेना-भाजपाची युती झाल्यास फायदा आम्हालाच होईल, असेही सांगायला ते विसरले नाहीत.