आॅनलाईन कंपन्यांना कोट्यवधीचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:14 PM2018-10-27T17:14:50+5:302018-10-27T17:14:53+5:30

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांनी कोट्यवधी रूपयांच्या वस्तूंची आॅर्डर केली

'Shock' billions of online companies | आॅनलाईन कंपन्यांना कोट्यवधीचा ‘झटका’

आॅनलाईन कंपन्यांना कोट्यवधीचा ‘झटका’

अरुण वाघमोडे
अहमदनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांनी कोट्यवधी रूपयांच्या वस्तूंची आॅर्डर केली मात्र ऐनवेळी याच ग्राहकांनी या वस्तू घेण्यास नकार दिल्याने आॅनलाईन कंपन्यांना नाईलाजास्तव हा माल परत बोलविण्याची नामुष्की ओढावली आहे. परिणामी कोट्यवधी रूपयांच्या विविध वस्तू कुरिअर कंपन्यांत पडून आहेत.
ग्राहकांना आॅनलाईनच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या वस्तू पुरविणाऱ्या अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांत शहरातील शेकडो ग्राहकांनी आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून मोबाईल आणि इतर वस्तूंची आॅर्डर दिली. आॅर्डर दिल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत या वस्तू ग्राहांच्या पत्यांवर कुरिअर कंपनीच्या माध्यमातून पोहोच झाली. या ग्राहकांनी मात्र या वस्तू घेण्यास नकार दिला. परिणामी हा सर्व माल कुरिअर कार्यालयात पडून आहे. शहरातील काही कुरिअर कार्यालयात तर हा माल ठेवण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे सदर आॅनलाईन कंपन्यांनी ट्रक पाठवून हा माल परत नेण्यास सुरूवात केली आहे. डिलेवरी रिजेक्ट करणा-या ९९ टक्के ग्राहकांनी आॅनलाईनच्या माध्यमातून मोबाईल आॅर्डर केले होते. आॅर्डर देऊन डिलेवरी का रिजेक्ट केली जात आहे. या विषयाची शहरात चर्चा रंगली आहे.
आॅनलाईन मार्केटमुळे व्यवसायिकांचे नुकसान
दिवाळीनिमित्त आॅनलाईन प्रॉडॅक्टस् सेल करणा-या कंपन्यांनी विविध आॅफर लॉन्च करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ग्राहक सध्या आॅनलाईन वस्तू खरेदी करण्यास पसंती देत आहेत. या आॅनलाईन मार्केटिंगमुळे स्थानिक व्यवसायावर परिणाम झाला आहे. आॅनलाईन वस्तू खरेदीत फसवणूक होण्याचाही धोका संभावतो.
कुरिअर कंपन्यांची अडचण
आॅनलाईनच्या माध्यमातून मागविलेला माल ग्राहक घेत नसल्याने कुरिअर कंपन्यांचीही अडचण झाली आहे. नाकारलेला माल जोपर्यंत कंपनी घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांना कार्यालयात संभाळून ठेवावा लागत आहे. ग्राहकांच्या पत्यावर माल घेऊन जाणा-या डिलेवरी बॉयलाही यामुळे फुकट हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

Web Title: 'Shock' billions of online companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.