स्मार्ट एलईडी प्रकल्पाला अर्थकारणाचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:21+5:302021-09-16T04:27:21+5:30

अहमदनगर : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्पात काही नगरसेवकच खोडा घालत असून, खासगी कार्यालयात बोलावून ठेकेदाराकडे पैशांची मागणी केली ...

The shock of economics to the smart LED project | स्मार्ट एलईडी प्रकल्पाला अर्थकारणाचा शॉक

स्मार्ट एलईडी प्रकल्पाला अर्थकारणाचा शॉक

अहमदनगर : महापालिकेचा महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्पात काही नगरसेवकच खोडा घालत असून, खासगी कार्यालयात बोलावून ठेकेदाराकडे पैशांची मागणी केली जात आहे, असा गंभीर आरोप पैलवान प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विकास कामांत खोडा घालणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविणार असल्याचा इशाराही प्रतिष्ठाणने दिला आहे.

शहरासह उपनगरांत स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निविदेला स्थायी समितीकडून अंतिम मंजुरी दिली गेली. ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे. असे असताना स्मार्ट एलईडी प्रकल्पाचे काम घेतलेल्या ठेकेदाराने सादर केलेल्या कागदपत्रांवर सेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी अक्षेप घेतला. तसे पत्र बोराटे यांनी आयुक्तांना मंगळवारी दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी काही नगरसेवक स्मार्ट एलईडी प्रकल्पात खोडा घालत असून, ठेकेदाराकडे पैशांची मागणी करत आहेत, अशी तक्रार पैलवान प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ओंकार घोलप यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्मार्ट एलईडी प्रकल्पाबाबत तक्रारी करून काही ब्लॅकमेलर नगरसेवक विकास कामांत खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा नगरसेवकांना पैलवान प्रतिष्ठान धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी गणेश गोरे, सागर आहेर, कृष्णा भागानगरे, अक्षय बोरुडे, रोहित सोनेकर, हृषिकेश कुसकर, आदित्य फाटक, ओंकार मुदगंटी, शिवम घोलप, शाहिद सय्यद, अजय तडका, सुशांत राठोड, ओंकार बिडकर, शुभम कोमाकूल, ओम दोंटा आदी तरुण उपस्थित होते.

...

एलईडी दिवे बसविण्याआधीच वाद सुरू

स्मार्ट एलईडी प्रकल्प भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाला. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेत सत्तांतर झाले आहे. महाविकास आघाडीची सत्ता आली. स्थायी समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. या समितीने प्रकल्पाच्या निविदांना अंतिम मंजुरी दिली. हा प्रकल्प कार्यारंभ आदेश देण्याच्या टप्प्यावर थांबला आहे. दरम्यान, सेनेचे नगरसेवक बोराटे यांनी याबाबत तक्रार केली असून, पैलवान प्रतिष्ठाणने ठेकेदाराला पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शहरात एलईडी दिवे बसविण्याच्या आधीच वाद सुरू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

.......

सूचना: फोटो १५ एलईडी नावाने आहे.

पैलवान प्रतिष्ठानचे प्रमुख ओंकार घोलप यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासोबत चर्चा केली. समवेत प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

Web Title: The shock of economics to the smart LED project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.