अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 08:10 PM2017-10-26T20:10:36+5:302017-10-26T20:22:52+5:30

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार ...

Shock of MSEDCL to 4.5 lakh farmers in Ahmednagar district; Turn off the power supply | अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

ठळक मुद्देथकबाकीची आकडेवारीअहमदनगर जिल्हा - ३ लाख ४१ हजार ४३६ शेतकरी (२ हजार २८५ कोटी थकबाकी)संगमनेर विभाग- एकूण ८० हजार ६७ शेतकरी (५२१ कोटी थकबाकी)कोपरगाव ग्रामीण- १३ हजार ९६३ शेतकरी (६६ कोटी थकबाकी)कोपरगाव शहर- २ हजार २१६ शेतकरी (११ कोटी थकबाकी)राहाता- १४ हजार ९५३ शेतकरी (८२ कोटी थकबाकी)संगमनेर ग्रामीण- २० हजार ९७९ शेतकरी (१८५ कोटी थकबाकी)संगमनेर शहर- १३ हजार ५७० शेतकरी (८९ कोटी थकबाकी)अकोले- १० हजार ३४१ शेतकरी (६२ कोटी थकबाकी)राजूर- ४ हजार ४५ शेतकरी (२१ कोटी थकबाकी)

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार २८५ कोटी रूपये थकविल्याने महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
२०१३-१४ पासून शेतक-यांनी शेतीपंपांची वीज देयके थकविली आहेत. अनेकदा कळवूनही देयके न भरल्याने नगर जिल्ह्याची थकबाकी २ हजार २८५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील १६ हजार १७९ शेतक-यांच्या ७८ कोटी रूपयांच्या थकबाकीचा, संगमनेर विभागातील ८० हजार ६७ शेतक-यांच्या ५२१ कोटी रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. संगमनेर ग्रामीणमध्ये सर्वाधिक १८५ कोटी तर राजूरमध्ये सर्वात कमी २१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण भरमसाठ असल्याने बुधवारी सायंकाळी संगमनेर विभागात महावितरणचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत थकबाकीदार ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतीपंपांच्या सर्व रोहित्रांची वीज सायंकाळपासून गायब झाली. थकबाकी असलेल्या देयकाच्या २० टक्के रक्कम भरल्यास वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होईल. या बैठकीस मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी.एन.चावडा(कोपरगाव ग्रामीण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.व्ही. महाजन (कोपरगाव शहर) आदी उपस्थित होते.

थकबाकीदार ७० टक्के शेतकरी ग्राहकांनी देयकाच्या किमान २० टक्के रक्कम भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही. तसेच रोहित्र जळाल्यास ७० टक्के रक्कम भरूनच बदलून दिले जाईल. शेतकºयांनी वेळेत वीज देयके भरून महावितरणला सहकार्य करावे.
-डी.बी.गोसावी, कार्यकारी अभियंता.

१५ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शेती पंपांवर कॅपिसिटर बसविण्यात येणार आहेत. कॅपिसिटरमुळे वीज गळती थांबण्यास मदत होईल. अतिरिक्त वीज वापर नियंत्रणात येईल. त्यासाठी किमान ७० टक्के थकबाकी भरणे क्रमप्राप्त आहे.
-डी.एन.चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कोपरगाव

Web Title: Shock of MSEDCL to 4.5 lakh farmers in Ahmednagar district; Turn off the power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.