धक्कादायक...हे पहा लॉगबुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 05:51 PM2019-05-11T17:51:26+5:302019-05-11T17:51:33+5:30

तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे

Shocking ... look at this logbook | धक्कादायक...हे पहा लॉगबुक

धक्कादायक...हे पहा लॉगबुक

दिलीप चोखर
राहाता : तालुक्यात खडकेवाके, कोºहाळे, केलवड, गोगलगाव या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ खडकेवाकेकरीता दररोज तीन खेपांना मंजुरी आहे मात्र पाण्याआभावी दोनच खेपा केल्या जात आहे. कोºहाळे येथे चार खेपांना मंजुरी असताना येथेही दोन खेपाच टाकल्या जातात़ टँकरचालकाकडे लागबुक आढळून आले नाही़ पाणी दिल्याची नोंद साध्या वहीवर केली जात असल्याचे निदर्शनास आले़
केलवड, गोगलगाव येथे टँकरच्या नियमित खेपा होतात़ एकूणच या चार गावांतील पाणी भरण्याचे ठिकाण पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे. खडकेवाके येथे पाणीपुरवठा करणारा टँकर (क्रमांक एम़ एच़ १७ सी-६३२८ या टँकरचे ठेकेदार युवराज गाडे यांच्या टँकरवरील चालक नवनाथ दाभाडे याच्याकडील टँकरचे पाणी पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी विचारणा केली़ या टँकरवर माहिती फलक दिसला, जीपीएस यंत्रणाही कार्यान्वित होती़ या टँकरचालकाकडे मात्र नियमित भरण्यात येणारे लॉकबुक ऐवजी साधी वही मिळाली़ त्या वहीत ८ मे पासून आजपर्यंत कोणत्या वस्तीवर व गावात पाणी दिले या बाबत नोंद केल्याचे आढळून आले़ यावर ग्रामपंचायतीचा शिक्का नव्हता़ सदर चालकाला लॉग बुक कुठे आहे असे विचारले असता नगरला पाठवले आहे असे त्याने सांगितले़ गावातील पाणीपुरवठ्याबाबतच्या महिला समितीतील सदस्यांच्या या वहीवर स्वाक्षऱ्या दिसल्या नाहीत़

 

Web Title: Shocking ... look at this logbook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.