धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 16:49 IST2021-01-24T16:48:03+5:302021-01-24T16:49:52+5:30
शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण
शेवगाव : शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत एका अज्ञाताने शेवगाव पोलिसांना फोन करुन या मृतदेहाची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, सुजित ठाकरे, पोलीस नाईक रवी शेळके, सुधाकर दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, काड्याकुड्या असे अवास्तव पडलेले दिसून आले आहे. मृतदेहाला मुंडके नसल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड बनले आहे. पोलिसांनी नगर येथील श्वास पथकाला पाचारण केले आहे.