धक्कादायक! महिलेचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:56 IST2025-02-14T14:56:03+5:302025-02-14T14:56:27+5:30
दगडाने ठेचून महिलेचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

धक्कादायक! महिलेचा दगडाने ठेचून खून; पोलिसांकडून तपास सुरू
Ahilyanagar Crime: पिंपळगाव माळवी (ता.अहिल्यानगर) शिवारातील कराळे वस्तीवरील महिलेचा राहत्या घरी निघृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी १२ ते ५ वाजेदरम्यान घडली. लताबाई नानाभाऊ कराळे (५०, रा. कराळे वस्ती, पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर) असे मयत महिलेचे नाव आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन रात्री शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. खुनामागील कारण समजू शकलेले नाही. दगडाने ठेचून महिलेचा खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.