धक्कादायक! ...अन् 'त्याने' स्वत:च्याच दुकानात संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:59 AM2020-06-25T11:59:16+5:302020-06-25T12:17:53+5:30
व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शिर्डी - शिर्डीमध्ये एका ५७ वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे स्वत: च्या मालकीच्या जनरल स्टोअर्समधील फॅनला दोरी बांधून गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम चुटके (५७) असं आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचं नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल सिद्धांतजवळ श्रीराम चुटके यांचे जनरल स्टोअर्स आणि कोल्डींक्सचे दुकान आहे. याच दुकानातील फॅनला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती शिर्डी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधांले यांनी दिली आहे. कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
पोलीस तपासात नेमकं कारण समजू शकेल. मात्र 17 मार्चपासून साई मंदिर बंद असल्याने शिर्डीतील संपूर्ण अर्थकारणच ठप्प आहे. लॉकडाऊनचा दिर्घ कालावधी त्यानंतर अनलॉक होऊन देखील मंदिर बंदच असल्याने भक्त नाहीत आणि त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडेल आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. कर्ज, हप्ते, घरखर्च अशा एक ना अनेक समस्या सतावत आहेत. अशाच नैराश्याचा हा बळी तर नाही ना असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
CoronaVirus News : उद्धव ठाकरेंच्या शेजारचा बंगला सील, परिसरात भीतीचे वातावरणhttps://t.co/MRT9nCZErI#coronainmaharashtra#uddhavThackeray#Mumbai#COVID19India
— Lokmat (@MiLOKMAT) June 25, 2020
CoronaVirus News : एकाच दिवसात तब्बल 16,922 कोरोना रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांजवळhttps://t.co/AFgGUDCRWk#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 25, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गाठला नवा उच्चांक
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान
'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर
"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"