आजपासून दुकाने, बाजारपेठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:33+5:302021-04-06T04:20:33+5:30
अहमदनगर : राज्य शासनाने रविवारी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करण्याचा ...
अहमदनगर : राज्य शासनाने रविवारी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करण्याचा आदेश दिला आहे. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार या पाचही दिवशी सर्व दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. हा आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
-----------
जमावबंदी- सोमवार ते शुक्रवार- सकाळी ७ ते रात्री ८ (एकत्र येण्यास बंदी)
संचारबंदी -सोमवार ते शुक्रवार- रात्री ८ ते सकाळी ७
शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७
--------------------------
या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, अन्य आरोग्यविषयक व वैद्यकीय सेवा, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, दुग्धालये, बेकरी, कन्फेक्शनरी, अन्नपदार्थ विक्री दुकाने, सार्वजनिक वाहतूक, ट्रेन, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, सर्व प्रकारची मालवाहतूक, कृषिविषयक सर्व सेवा, ई- कॉमर्स, प्रसारमाध्यमांच्या संस्था, आपत्ती व्यवस्थापनाने घोषित केलेल्या आवश्यक सेवा. याशिवाय एमआयडीसीमधील कारखाने सर्व नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
-------------------
हे असेल दिवसभर बंद
दुकाने, मार्केट, माॅल्स (अत्यावश्यक सेवा वगळून)
खासगी वाहतूक
-----------
हे दिवसभर सुरू राहील
उद्याने, क्रीडांगणे
सहकारी, सार्वजनिक, खासगी बँका
वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या
टेलिकॉम पुरवठादार
विमा, मेडिक्लेम कंपनी
औषधे वितरणाची कार्यालये, कंपनी,
सर्व सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने
वीजपुरवठा, पाणीपुरवठा, बँकिंग, वित्तीय सेवा पूर्ण क्षमतेने
सर्व कारखाने, उत्पादन युनिट
---------
हे पूर्णपणे (दिवसा व रात्री )बंद असेल
सिनेमा, नाट्यगृहे, सभागृहे,करमणूक केंद्र, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्हीडिओ गेम, वॉटर पार्क, रेस्टारंट, बार, धार्मिक स्थळे, उपासना स्थळे, केश कर्तनालये, स्पा, ब्युटी पार्लर, सलून, शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्याच्या कडेला खाद्य पदार्थांच्या विक्रीच्या ठिकाणी खाण्यास बंदी असेल. दरदिवशी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल, होम डिलिवरी देण्यास मुभा असेल.
-----------
हॉटेलचे काय ?
हॉटेलच्या आवारात असलेले रेस्टारंट, बार वगळता इतर सर्व रेस्टारंट, बार बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत टेक अवे, पार्सल, होम डिलिवरी चालू राहील. शनिवारी, रविवारी होम डिलिवरी चालू राहील. या कालावधीत खाद्य पदार्थ्यांची ऑर्डर य देण्यासाठी रेस्टारंट, बारला भेट देता येणार नाही.