नेवासा तालुक्यात कोविड लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:40+5:302021-03-31T04:20:40+5:30
नेवासा तालुक्यात कोणत्याही आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही. यामुळे नोंदणी केलेल्या व थेट केंद्रावर आलेल्या नागरिकांना परत जावे लागत ...
नेवासा तालुक्यात कोणत्याही आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नाही. यामुळे नोंदणी केलेल्या व थेट केंद्रावर आलेल्या नागरिकांना परत जावे लागत आहे. पहिल्या डोससाठी नागरिकांना ३ एप्रिल रोजी लस उपलब्ध होईल. तर दुसऱ्या डोसची लस १ एप्रिल रोजी नेवासा ग्रामीण आरोग्य केंद्रात मिळणार आहे.
खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस मिळत असली तरीही नागरिकांची प्रथम पसंती आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या लसीला आहे. ३५ टक्के नागरिक कोविड संकेतस्थळावर लस घेण्यासाठी नोंदणी करून, लस उपलब्धतेनुसार आपल्याला हव्या असलेल्या तारखेला लस घेण्याचा पर्याय निवडतात. सध्या लस शिल्लक नसल्याने नोंदणी केलेल्या सजग नागरिकांचा हिरमोड होतोय.
......
सध्या नेवासा तालुक्यात कोणत्याही आरोग्य केंद्रावर कोविड लस उपलब्ध नाही. लस उपलब्ध झाल्यावर नोंदणी केलेल्या व थेट आलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल. येथे कोणाचीही अडवणूक होणार नाही. लस घेण्यासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड सोबत आणावे. - डॉ. मोहम्मद शाहीद, वैद्यकीय अधिकारी, नेवासा फाटा