रेमडेसिवीरच्या तुटवड्याने धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:49+5:302021-04-10T04:20:49+5:30

अन्न व औषधे प्रशासनाने काल रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील ठरावीक मेडिकलची यादी जाहीर केली. या यादीत शिर्डीतील संस्थानच्या ...

The shortage of Remedesivir exacerbated the situation | रेमडेसिवीरच्या तुटवड्याने धडधड वाढली

रेमडेसिवीरच्या तुटवड्याने धडधड वाढली

अन्न व औषधे प्रशासनाने काल रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील ठरावीक मेडिकलची यादी जाहीर केली. या यादीत शिर्डीतील संस्थानच्या कोविड सेंटरचा व तालुक्यातील प्रवरानगर रुग्णालय वगळता अन्य मेडिकलाचा समावेशच नाही. कमलाकर कोते, नीलेश कोते, सचिन चौघुले, डॉ. एकनाथ गोंदकर, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर, अमृत गायके, उमेश शेजवळ यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

राजकारण होत असल्याचा आरोप करत महाआघाडीच्या नेत्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून सहायक आयुक्तांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसांत राहाता व शिर्डी येथे दहा मेडिकलमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध झाले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौघुले यांनी संस्थानच्या कोविड सेंटरला भेट देऊन तेथील अनेक चांगल्या बाबींबरोबरच उणिवांकडे तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे. रेमडेसिवीरचा घोडेबाजार, खासगी कोविड सेंटरकडून सुरू असलेली लूट, नियमावलीचे उल्लंघन, आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव याबाबी चौघुले यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. संस्थानच्या सेंटरला असलेले सगळे ६३ ऑक्सिजन व ३ व्हेंटिलेटर बेड हाऊसफुल आहेत. येथे डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना चांगल्या सेवा मिळत नाहीत. या सेंटरला रोज दोनशे, तर तालुक्यातील अन्य सेंटरला किमान शंभर रेमडेसिवीरची पूर्तता करावी, अशी मागणी चौघुले यांनी केली आहे.

..................

तहसीलदार कुंदन हिरे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. नगरला अन्न व औषध प्रशासनाकडे विचारणा केली असता राहाता तालुक्यातील अनेक मेडिकल स्टोअर्सलासुद्धा रेमडेसिवीर ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे, असे सांगितले.

Web Title: The shortage of Remedesivir exacerbated the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.