श्रीरामपूर बाजार समितीत कांद्यासएक हजार ४०० रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 07:21 PM2019-05-21T19:21:39+5:302019-05-21T19:22:32+5:30
येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये रविवारी झालेल्या लिलावात सुमारे २८ हजार कांदा गोणीची आवक होती.
श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये रविवारी झालेल्या लिलावात सुमारे २८ हजार कांदा गोणीची आवक होती. लिलात प्रथम प्रतीच्या कांद्यास क्विंटलमागे एक हजार ३०० रुपये दर मिळाला. एका १५ गोणीच्या वक्कलची एक हजार ४०० रुपये भावाने विक्री झाली.
कांद्याचे भाव तेजीत असल्यामुळे उत्पादक शेतकरी माल बाजार समित्यांमध्ये आणत आहे. आवक वाढली असून गत सप्ताहापेक्षा १०० ते१५० रुपये प्रतिक्विंटलने भाव तेजीत राहिले आहेत. लिलावात गुणवत्तेनुसार कांद्यास ९०० ते एक हजार ४००, ६०० ते ८५०, २०० ते ४५० रुपये दर मिळाला.
शेतकऱ्यांची खरीप पिकासाठी जमीन मशागतीची कामे सुरु झाली आहेत. भाव वाढतील या आशेने कांदा चाळीत कांदा साठवून ठेवण्यात आला होता. मात्र दुष्काळ व आर्थिक अडचणीमुळे शेतकरी साठवलेला आता तो बाहेर काढत आहे.
कांद्यास आंध्र,कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व तेलंगणा राज्यातून मागणी वाढली आहे. गोल्टी कांद्यास मात्र भाव चांगले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी मात्र उच्च प्रतीच्या कांद्याच्या दरापेक्षआा दुय्यम व तिसºया प्रतीच्या कांद्यास भाव कमी असल्यामुळे समाधानी नाहीत.