श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या शुभांगी पोटे आघाडीवर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:13 AM2019-01-28T11:13:13+5:302019-01-28T11:13:58+5:30
भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली
श्रीगोंदा : भाजप व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे आघाडीवर आहेत. भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे ७०० मतांनी पिछाडीवर आहे.
आघाडीच्या संगिता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, सुनीता खेतमाळीस यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाच्या दिपाली औटी, संग्राम घोडके विजयी झाल्या आहेत. प्रभाग सातमधून आघाडीचे निसार बेपारी व सोनल घोडके यांनी विजय मिळविला आहे. प्रभाग सहामधून भाजपाच्या अशोक खेंडके, मनिषा लांडे यांनी विजय खेचून आणला आहे.
नगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात आहेत. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत आहे. दुपारपर्यत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.