श्रीगोंद्याचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 03:56 PM2020-06-07T15:56:46+5:302020-06-07T15:57:33+5:30
श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. खेंडके यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. खेंडके यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.
अशोक खेंडके यांनी यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये पोटनिवडणुकीत माजी नगराध्यक्ष अख्तारभाई शेख यांच्या मुलाचा पराभव केला. त्यानंतर अख्तारभाई शेख यांचा पराभव केला. त्यामुळे श्रीगोंदा शहरात भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले होते.
अशोक खेंडके यांना उपनगराध्यक्षपदासाठी पाचपुते बंधूंनी संधी दिली होती. उपनगराध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. त्यानंतर खेंडके यांच्यावर उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून दबाव वाढला होता.
दरम्यान, माजी मंत्री बबनराव पाचपुते हे उपनगराध्यक्षपदी कोणाची निवड करतात? याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष लागले आहे.