श्रीगोंद्यात नागरिकांनी नगरपालिकेला दिल्या मूर्ती, प्रशासनाने एकत्रितपणे केले विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 12:34 PM2020-09-02T12:34:13+5:302020-09-02T12:35:31+5:30
श्रीगोंदा ( जि. अहमदनगर): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी घरोघर बसविलेल्या गणपतीच्या मुर्ती नगरपालिकेला दान दिल्या. पालिका, तालुका प्रशासनाने एकत्रीतपणे या गणेश मुर्तीचे विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप दिला.
श्रीगोंदा ( जि. अहमदनगर): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी घरोघर बसविलेल्या गणपतीच्या मुर्ती नगरपालिकेला दान दिल्या. पालिका, तालुका प्रशासनाने एकत्रीतपणे या गणेश मुर्तीचे विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप दिला.
श्रीगोंदा नगरपालिकेने गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन टॅक्टर सजविले होते. घरोघर जाऊन मुर्ती स्विकारल्या. प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गटनेते मनोहर पोटे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, सतिश मखरे,प्रशांत गोरे, संतोष खेतमाळीस यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले.
प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शहर तसेच तालुक्यात एक गाव एक गणपतीची संकल्पना मांडली. त्यासही प्रतिसाद मिळाला होता.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले कोरोना संकटात शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास प्रतिसाद दिला. एकूण 15 ठिकाणी गणपती बसविण्यात आले. पेडगाव येथे 2 ठिकाणी मुलांनी गणपती बसविले. त्याचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले.
मनोहर पोटे म्हणाले, शहरात एक गाव एक गणपतीची संकल्पना बाबासाहेब भोस यांनी मांडली. शहरात एकाच ठिकाणी गणपती बसविण्याचा निर्णय झाला. घराघरात बसविण्यात आलेल्या गणेशाचे विसर्जन शांततेत केले.