श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या शुभांगी पोटे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:33 AM2019-01-28T11:33:31+5:302019-01-28T11:55:58+5:30

भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या.

Shrigonda Municipality: Congress's Shubhangi Pote won | श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या शुभांगी पोटे विजयी

श्रीगोंदा नगरपालिका : काँग्रेसच्या शुभांगी पोटे विजयी

श्रीगोंदा : भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा 2100 मतांनी पराभव केला.
भाजपाने 11 जागांवर विजय मिळविला तर आघाडीने 08जागांवर विजय मिळविला. आघाडीच्या संगिता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, सुनीता खेतमाळीस यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाच्या दिपाली औटी, संग्राम घोडके विजयी झाल्या आहेत. प्रभाग सातमधून आघाडीचे निसार बेपारी व सोनल घोडके यांनी विजय मिळविला आहे. प्रभाग सहामधून भाजपाच्या अशोक खेंडके, मनिषा लांडे यांनी विजय खेचून आणला आहे.
नगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात होते. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी यांच्यात लढत होती.

Web Title: Shrigonda Municipality: Congress's Shubhangi Pote won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.