श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 03:20 PM2019-01-17T15:20:47+5:302019-01-17T15:21:41+5:30
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सेनेने नगराध्यक्ष पदासाठी विद्या आनंदकर व मिनल भिंताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सेनेने नगराध्यक्ष पदासाठी विद्या आनंदकर व मिनल भिंताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सेना नेते घनश्याम शेलार यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा पदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहेत.
नगरसेवक पदासाठी १७ पैकी दहा जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सेनेचे दहा मावळे रणांगणात राहणार आहेत. मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली होती. नगराध्यक्ष उमेदवारी कोणाची ठेवावी यावर वेगवेगळ्या पध्दतीने चर्चा होती. पण जातीय राजकारणाचा घाणेरडेपणा पाहावयास मिळाला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेलार यांनी सांगितले. नगरसेवक पदासाठी १० उमेदवार उभे केले आहेत. उमेदवाराचा मी पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहे. सेनेचे किती नगरसेवक निवडून येतील मला माहीत नसल्याचे शेलार यांनी सांगितले.
बाहेरील मंडळीनी दबाब आणला म्हणून सेनेला भुमिकेत काहीसा बदल करावा लागला असल्याचा सेनेचे तालुकाप्रमुख संजय आनंदकर यांनी केला.