श्रीगोंदा तालुका काँग्रेसची भाळवणीच्या कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:21 AM2021-05-21T04:21:13+5:302021-05-21T04:21:13+5:30
काष्टी : काँग्रेसचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी आमदार नीलेश लंके यांच्या भाळवणी (ता.पारनेर) येथील शरदचंद्र पवार काेविड ...
काष्टी : काँग्रेसचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी आमदार नीलेश लंके यांच्या भाळवणी (ता.पारनेर) येथील शरदचंद्र पवार काेविड सेंटरला ११ पोती साखर, ११ पोती तांदूळ, ११ डबे तेल, ११ हजाराचा धनादेश नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते नीलेश लंके यांंच्याकडेे सुपूर्द केला.
यावेळी भोसले म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात नीलेश लंके यांनी हजारो कुटुंबांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यामुळे देवरूपी लंके यांचे पाय धुताना आनंद वाटला. आढळगाव येथील सिद्धेश्वर कोविड सेंटरला १५० किलो साखर, १५० रवा, ७५० बिस्कीट पुडे, ५०० अंडी व लिंपणगाव येथील सिद्धेश्वर कोविड सेंटरला १०० किलो साखर, १०० किलो रवा, २ डबे तूप, ५०० अंडी मदत दिली. तालुक्यातील अन्य कोविड सेंटरलाही मदत करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, दूध संघाचे माजी अध्यक्ष सुरेश लोखंडे, बाजार समितीचे सभापती संजय जामदार, सरचिटणीस बाळाप्पा पाचपुते, लिपंणगावचे उपसरपंच अरविंद कुरुमकर, सुनील सूर्यवंशी, प्रथमेश भोसले, शरद शिर्के उपस्थित होते. गेल्या वर्षी २०२० मध्ये दीपक भोसले यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीस १ लाख ११ हजार रुपयांची मदत दिली होती.
---
२० भाळवणी
भाळवणी येथील कोविड सेंटरला श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्या वतीने विविध प्रकारची मदत देण्यात आली. यावेळी आमदार नीलेश लंके व इतर.