श्रीपाद छिंदमचा निषेध : संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलीसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:30 PM2018-08-02T13:30:07+5:302018-08-02T13:37:06+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणा-या महापालिकेच्या सभेला येणार असल्याने संभाजी ब्रिगेडने निदर्शने करत निषेध केला.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणा-या महापालिकेच्या सभेला येणार असल्याने संभाजी ब्रिगेडने निदर्शने करत निषेध केला.
यावेळी तोफखाना पोलिसांनी संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच महापालिका परिसरात पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वकतव्याची आॅडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर वातावरण तणावपूर्ण बनले होते. उपमहापौर छिंदम याने राजीनामा दिल्याचेही खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले होते.