श्रीपाद छिंदम महापालिकेत आला अन निवेदन देऊन गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:51 PM2018-08-02T13:51:59+5:302018-08-02T16:40:21+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणा-या महापालिकेच्या सभेत हजर झाला परंतु सभागृहात नगरसेवकांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी सुरु करताच महापौरांकडे निवेदन देऊन तो काही क्षणात निघून गेला. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर महापालिकेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम आज होणा-या महापालिकेच्या सभेत हजर झाला परंतु सभागृहात नगरसेवकांनी त्याच्याविरोधात घोषणाबाजी सुरु करताच महापौरांकडे निवेदन देऊन तो काही क्षणात निघून गेला. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर महापालिकेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीपाद छिंदमने मनपा कर्मचा-याला उद्देशून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वकतव्याची आॅडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर वातावरण तणावपूर्ण बनले होते. उपमहापौर छिंदम याने राजीनामा दिल्याचेही खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले होते. मात्र छिंदम याने मी राजीनामा दिला नसल्याचा खुलासा केला आहे. आजच्या सभेला छिंदम येणार असल्याचे समजताच संभाजी ब्रिगेडने निदर्शनेही केली. यावेळी पोलिसांनी ८ ते १० जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर अर्ध्याच तासात छिंदम पालिकेत हजर झाला. त्यावेळी त्याच्याविरोधात मनपा नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. तोचबरोबर छिंदम याने महापौर सुरेखा कदम यांना निवेदन दिले. त्यानंतर लगेच तो निघून गेला.