श्रीरामपूर महिला मंडळाच्या डॉक्टर-आपण उपक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:39+5:302021-05-24T04:19:39+5:30
कोरोना संसर्ग, त्याचा इतिहास, लक्षणे, उपचार तसेच लसीकरणाविषयी त्यांनी माहिती दिली. महिलांच्या विविध प्रश्नांना डॉ. पडघन यांनी समाधानपूर्वक उत्तरे ...
कोरोना संसर्ग, त्याचा इतिहास, लक्षणे, उपचार तसेच लसीकरणाविषयी त्यांनी माहिती दिली. महिलांच्या विविध प्रश्नांना डॉ. पडघन यांनी समाधानपूर्वक उत्तरे दिली. महिलांनी गृहिणी आणि कुटुंबप्रमुख या नात्याने कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर प्रतिबंध कसा करावा तसेच मुले, तरुण, प्रौढ आणि वृद्ध यांच्या जीवनशैलीत, आहारविहारात योग्य तो बदल कसा करावा यावर डॉ. पडघन यांनी मार्गदर्शन केले.
मंडळाने सद्य परिस्थितीत प्राणवायूचे महत्त्व या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरही शिबिर आयोजित केले. पंधरा दिवसांचे प्राणायाम या विषयावरचे शिबिर मंडळाच्या सदस्य भगिनींसाठ लाभदायी ठरले. येथील योगशिक्षिका नीलम कृपाल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यात साठ भगिनींनी लाभ घेतला. योग्य श्वसनाचे महत्त्व आणि प्राणायामाचे विविध प्रकार शिकवले गेले. दोन्हीही उपक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.