श्रीरामपूर, राहुरीतील तेरा गुन्हेगार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:46 AM2019-05-18T10:46:05+5:302019-05-18T10:46:35+5:30
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील १३ अट्टल गुन्हेगारांवर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
श्रीरामपूर : श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील १३ अट्टल गुन्हेगारांवर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
शहरातील आनंदा यशवंता काळे ( रा.सूतगिरणी परिसर, दत्तनगर), अक्षय बाळू जाधव (शनी चौक), योगेश राजेंद्र काळे (रा.वडाळा महादेव), विनोद विजय चव्हाण (रा.अशोकनगर), सुरेश योहान उबाळे (रा.रासकरनगर) यांना दोन वर्षांकरिता, तर मुश्ताक याकूब शेख (सुभेदार वस्ती) याला एक वर्षाकरिता, सादिक रुबाब शहा (रा.प्रभाग दोन),तौफिक शब्बीर शेख (रा.प्रभाग दोन), दानिश जानमहमंद शेख यांना सहा महिण्याकरिता तर राजेंद्र कुंडलिक भालेराव (रा.वडाळा महादेव) याला तीन महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील अविनाश श्रीधर साळवे (रा.बारागाव नांदूर,ह.मु.येवले आखाडा), संभाजी शिवाजी उगले (रा.धामोरी) यांना दोन वर्षांकरिता तर रवींद्र सूर्यभान माळी (रा.बारागाव नांदूर) याला एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे