श्रीरामपूर तालुक्याला पावसाने झोडपले; टाकळीभान, बेलापूर मंडलात तीन इंच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 04:41 PM2020-06-26T16:41:10+5:302020-06-26T16:41:19+5:30

श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. टाकळीभान व बेलापूर मंडलांमध्ये दोन ते तीन इंच पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना त्यामुळे जीवनदान मिळाले आहे.

Shrirampur taluka was lashed by rains; Three inches of rain in Taklibhan, Belapur Mandal | श्रीरामपूर तालुक्याला पावसाने झोडपले; टाकळीभान, बेलापूर मंडलात तीन इंच पाऊस

श्रीरामपूर तालुक्याला पावसाने झोडपले; टाकळीभान, बेलापूर मंडलात तीन इंच पाऊस

श्रीरामपूर : तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. टाकळीभान व बेलापूर मंडलांमध्ये दोन ते तीन इंच पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना त्यामुळे जीवनदान मिळाले आहे.

सुमारे पंधरा दिवस पावसाने ताण दिल्याने शेतक-यांनी विहिरी व बोअरवेलमधून पिकांना पाणी सुरू केले होते. भंडारदराचे आवर्तन सुरू असल्याने हे पाणीही पिकांना दिले जात होते. मात्र गुरुवारी रात्री शहर वगळता ग्रामीण भागामध्ये सर्वदूर चांगला पाऊस झाला. 

टाकळीभान, भोकर, वडाळा महादेव, मुठेवाडगाव, बेलापूर, भेडार्पूर, मालुंजे, माळेवाडी, उंदिरगाव येथे ३० ते ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. टाकळीभान येथे सर्वाधिक ५५ मिलीमीटर तर बेलापूर येथे ४४ मिलीमीटर पाऊस झाला.

आजअखेर उंदिरगाव मंडलामध्ये २१० मिलीमीटर, बेलापूर येथे २२३ तर टाकळीभान मंडलात २६२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

Web Title: Shrirampur taluka was lashed by rains; Three inches of rain in Taklibhan, Belapur Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.