‘निळवंडे’ला विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य उघडे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:31+5:302021-05-24T04:20:31+5:30

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला रविवारी (दि. २३) महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित ...

Shukracharya of Jhari, who opposed 'Nilwande', was exposed | ‘निळवंडे’ला विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य उघडे पडले

‘निळवंडे’ला विरोध करणारे झारीतील शुक्राचार्य उघडे पडले

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला रविवारी (दि. २३) महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर आयोजित एका बैठकीत मंत्री थोरातांनी आमदार विखे यांच्यावर निशाणा साधला.

थोरात म्हणाले, अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या धरणाच्या कालव्यांच्या कामांना वेग आला आहे. ही कामे पूर्ण करत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी देणे हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. मात्र, २०१४ ते २०१९ या पाच वर्षात राज्यात भाजपची सत्ता असताना निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे थांबली होती. अनेकांनी या भागात येऊन ग्रामस्थांची मने दूषित करण्याचा प्रयत्न केला. काहींना गावबंदीसाठी पुढे करण्यात आले. आता ते कुठे गेले, हे शोधण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासंदर्भात बैठक घेतली. कोरोनाच्या संकटातही कालव्यांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता भासणार नाही. पुढील पावसाळ्यात लाभार्थी गावांना निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे मिळेल, असा विश्वासही मंत्री थोरात यांनी व्यक्त केला.

-------------

‘फार विशेष काही नाही

राज्यात जमावबंदी असूनही तीन मंत्री व अधिकाऱ्यांनी आदेशाचा भंग करून कार्यक्रम घेतला. या मंत्र्यांसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लाेखंडे यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले त्यांनी ‘फार विशेष काही नाही त्यामध्ये’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Shukracharya of Jhari, who opposed 'Nilwande', was exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.