शाकाहारी हॉटेलांमध्ये पहिल्या दिवशी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:58 AM2020-10-06T11:58:40+5:302020-10-06T11:59:03+5:30
कोरोनाच्या भितीने ग्राहक येत नाहीत़ त्यामुळे हॉटेल चालकांनी स्वच्छतेला महत्व दिले आहे़ त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वयंपाकी पासून ते वेटरपर्यंत सर्वांना मास्क, सॅनिटायझर, खुर्च्या टेबल नियमित सॅनिटाईज करणे, ग्राहकांना सॅनिटायझर देणे, यासारखी काळजी हॉटेल चालकांकडून घेतली जात आहे़
अण्णा नवथर ।
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील बार, रेस्टॉरंटस्, हॉटेल पुन्हा सुरू झाले खरे, पण कोरोनाच्या भितीने कुणीही तिकडे फिरकायला तयार नाही़ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल चालकांनी अनेक योजना आणल्या आहेत़ परंतु, कोरोनापुढे त्या फिक्या पडत आहेत. सध्या फक्त बार रेस्टॉरंटस् आणि नॉनव्हेज हॉटेलमध्येच गर्दी होताना दिसत आहे़ उर्वरित शुध्द शाकाहारी हॉटेलांमध्ये पहिल्या दिवशीही शुकशुकाटच होता.
नॉनव्हेज हॉटेलांनी वाढविले दर
कोरोनामुळे प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नॉनव्हेज खाण्याकडे नागरिकांचा कल आहे़ हे प्रमाण वाढल्यामुळे हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये बदल झाला असून, दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे़ल्या मार्च महिन्यापासून रेस्टारंट, बार, फुडपार्क, व्हेज, नॉनव्हेज हॉटेल, चहाच्या टपºया, कॅन्टीन बंद होते़ राज्य शासनाने हॉटेल सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला़ परंतु, हॉटेलच्या वेळांबाबत स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कुठलाही आदेश जारी करण्यात आलेला नाही़ त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये हॉटेलच्या वेळांबाबत संभ्रम आहे़ काही महिन्यानंतर हॉटेल सुरू झाले असले तरी पूर्वीप्रमाणे ग्राहक हॉटेलमध्ये गर्दी करताना दिसत नाही़ कोरोनाच्या भितीमुळे सहकुटुंब हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याचे कुणी धाडस करत नाही़ रेस्टॉरंट , बार आणि नॉनव्हेजमध्ये मात्र ग्राहकांची गर्दी होताना दिसते आहे़ पहिल्या दिवशीही अशा हॉटेलमध्ये काहीप्रमाणात ग्राहक होते़ परंतु, शुध्द शाकाहारी हॉटेलमध्ये मात्र शुकशुकाट होता़
घेतली जाणारी दक्षता : कोरोनाच्या भितीने ग्राहक येत नाहीत़ त्यामुळे हॉटेल चालकांनी स्वच्छतेला महत्व दिले आहे़ त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी स्वयंपाकी पासून ते वेटरपर्यंत सर्वांना मास्क, सॅनिटायझर, खुर्च्या टेबल नियमित सॅनिटाईज करणे, ग्राहकांना सॅनिटायझर देणे, यासारखी काळजी हॉटेल चालकांकडून घेतली जात आहे़
स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधने
स्थानिक जिल्हा प्रशासनाने ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे़ ही परवानगी देताना शारीरिक अंतर ठेवून व स्वच्छतेच्या उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे़ तसेच याबाबत पर्यटन विभागाकडून स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे़ परंतु, तसा आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही़
कामगारांची
शोधाशोध सुरूच
हॉटेलमध्ये काम करणारे स्वयंपाकी, वेटर हे परराज्यातील असतात़ लॉकडाऊनमध्ये कामगार आपल्या गावी निघून गेले़ ते सध्या परत येत आहेत़ परंतु, काहीजण येण्यास तयार नाहीत़ त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना कामगारांचा शोध घ्यावा लागत आहे़