दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट

By सुदाम देशमुख | Published: May 23, 2023 01:28 PM2023-05-23T13:28:27+5:302023-05-23T13:28:27+5:30

ग्रामीण  भागात असलेल्या बँकेच्या आवारात रिजर्व बँकेने केलेल्या सूचनांचे उलंघन होताना दिसत आहे.

Shukshukat in rural areas to exchange 2000 notes | दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट

दोन हजाराच्या नोटा बदलण्यास ग्रामीण भागात शुकशुकाट

पुणतांबा(जि. अहमदनगर ): भारतीय रिजर्व बँकेने आज पासून दोन हजाराच्या चलनी नोटा जमा करण्यास किंवा बदलून घेण्यास सुरवात केली असली तरी गेल्या कित्येक दिवसापासून ग्रामीण भागात दोनहजाराच्या चलनी नोटा तुरळक जणांकडे असल्याने अजून तरी सामान्य नागरिक नोटा जमा  किंवा बदलण्यास बँकेकडे आले नाहीत. आता येथून पुढे शेतकरी वर्गाला आपल्या दिलेल्या भुसार मालाच्या बदल्यात व्यापाऱ्याकडून दोन हजाराच्या चलनी नोटा दिल्या जातील अशी अटकळ सामान्य शेतकरी व्यक्त करतोय. 

 ग्रामीण  भागात असलेल्या बँकेच्या आवारात रिजर्व बँकेने केलेल्या सूचनांचे उलंघन होताना दिसत असून बँकेच्या ग्राहकांना सावलीसाठी मंडप, तात्पुरती सोय केलेली नाही. ही बाब प्रथमदर्शनी दिसून आली.

Web Title: Shukshukat in rural areas to exchange 2000 notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.