मनपा रुग्णालयाकडे फिरकेनात रुग्ण

By Admin | Published: May 21, 2014 11:54 PM2014-05-21T23:54:16+5:302014-05-22T00:03:20+5:30

अहमदनगर: एकीकडे रुग्णालयांवरील खर्चात भरमसाठ वाढ होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या क्षीण होत चालली आहे़

The sick patient is recovering from the Municipal Hospital | मनपा रुग्णालयाकडे फिरकेनात रुग्ण

मनपा रुग्णालयाकडे फिरकेनात रुग्ण

अहमदनगर: एकीकडे रुग्णालयांवरील खर्चात भरमसाठ वाढ होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या क्षीण होत चालली आहे़ त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ही संख्या का घटली, याची कारणे शोधण्याची गरज आहे़ जिल्हाभरातून रुग्ण शहरात उपचारासाठी येत असतात़ शहरातील खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत़ बड्या रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागतात़ असे असले तरी ही सेवा नागरिकांना मोफत मिळावी, यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये आरोग्य सेवेवर खर्च करते़ रुग्णांवरील खर्चात भरमसाठ वाढ झाली़ महापालिकेच्या कै ़ बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले़ इतर रुग्णालयांत वैद्यकीय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे़वैद्यकीय तज्ज्ञांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे़ या रुग्णालयांत अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे़ सर्व सुविधांयुक्त रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढणे अपेक्षित होते़ मात्र झाले उलटेच, अलीकडे महापालिका रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे़ परिणामी रुग्णालयांवर होणारा खर्च अक्षरश: वाया जाण्याची शक्यता आहे़ अत्यल्प दरात ही सेवा पुरविली जात होती़ दर कमी असताना रुग्णांची संख्याही मोठी होती़ परंतु सन २०११ मध्ये दरवाढ करण्यात आली़ त्यामुळे रुग्ण उपचारासाठी येत नाहीत़ ते खासगी रुग्णालयास प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे ही संख्या घटली असल्याचे कारण आरोग्य विभागाने स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत दिले़ मात्र उत्तम सेवा पुरविणार्‍या रुग्णालयांत हेच दर भरमसाठ आहेत़ तरीदेखील रुग्ण खासगी रुग्णालयात का उपचार घेतात, हे शोधण्याची गरज निर्माण झाली असून, याविषयी पदाधिकार्‍यांनी लक्ष घालावे,अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The sick patient is recovering from the Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.