सिद्धटेकला ४०० केव्ही उपकेंद्र होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:35 PM2019-03-02T18:35:46+5:302019-03-02T18:36:42+5:30
कर्जत तालुक्यातील सिध्दटेक (देऊळवाडी) येथे ४०० केव्ही उपकेंद्र मंजूर झाले आहे. या ३६८ कोटी रूपयांच्या कामांची निविदा प्रसिध्द झाली आहे.
सिध्दटेक: कर्जत तालुक्यातील सिध्दटेक (देऊळवाडी) येथे ४०० केव्ही उपकेंद्र मंजूर झाले आहे. या ३६८ कोटी रूपयांच्या कामांची निविदा प्रसिध्द झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बाभळेश्वर येथे ४०० के. व्ही. उपकेंद्र आहे. या एका केंद्रावरच जिल्ह्यातील वीज वितरणाचा अतिरिक्त भार पडत होता. ही अडचण सोडविण्यासाठी आणखी एवढ्याच क्षमतेच्या उपकेंद्राची आवश्यकता होती. कर्जत तालुक्यातील सिद्धटेक (देऊळवाडी ) शिवारातील १७ हेक्टर सरकारी जमिनीवर हे उपकेंद्र उभे राहणार आहे. यासाठी ३६८.७२ कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १९५.१५ कोटी रूपयांच्या कामांची निविदा तातडीने प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट् राज्य विद्युत पारेषण कंपनीकडे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अगोदर भूमिपूजन अपेक्षित आहे. २४ महिन्यात काम पूर्ण होणार आहे.
या उपकेंद्राचे स्थानिकांना फायदा मिळणार असून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होणार आहे. तसेच औद्योगिकरणास चालना मिळून काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे दोन रोहित्र बसविण्यात येणार आहे. औरंगाबाद-लोणी कंद यांना जोडणाऱ्या प्रवाहातून मुख्य वीज पुरवठा घेणार आहेत. या उपकेंद्रातून सुरूवातीस जेऊर (सोलापूर), भिगवण (पुणे), बेलवंडी भोसे (श्रीगोंदा) या उपकेंद्रांना विद्युत प्रवाह केला जाणार आहे. सुमारे ५० कर्मचारी कायमस्वरूप अपेक्षित आहेत. -कुंदन पवार, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, महाराष्टÑ वीज पारेषण कंपनी, नाशिक-नगर.