सिद्धार्थनगर शाळा हायटेक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:17+5:302021-06-16T04:29:17+5:30
श्रीगोंदा : समाजकल्याण विभागामार्फत श्रीगोंदा येथील सिद्धार्थनगर प्राथमिक शाळेत सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळा हायटेक करण्यात ...
श्रीगोंदा : समाजकल्याण विभागामार्फत श्रीगोंदा येथील सिद्धार्थनगर प्राथमिक शाळेत सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळा हायटेक करण्यात येईल, असे समाजकल्याण सभापती उमेश परहर यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी कोरोनाचे सर्व नियम पाळत सिद्धार्थनगर शाळेत झालेल्या या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे हे होते.
यावेळी नगरसेवक संग्राम घोडके, हृदय घोडके, गणेश घोडके, लक्ष्मण घोडके, सुनील घोडके, अविनाश घोडके, दीपक घोडके, भाऊसाहेब घोडके, बजरंग घोडके, शिवाजी घोडके, विशाल घोडके, दादाराम घोडके, सारिका उमाप, रुपाली वायदंडे, मनीषा शिंदे, दीपाली घोडके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी केले. सूत्रसंचालन शारदा शेळके यांनी केले, आभार मंगल जाचक यांनी मानले.