‘सिद्धिविनायक’ची कॅशलेस सेवा प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:54+5:302021-02-16T04:21:54+5:30

सिद्धिविनायक पतसंस्थेच्या १७व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी काका कोयटे बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब ...

Siddhivinayak's cashless service is inspiring | ‘सिद्धिविनायक’ची कॅशलेस सेवा प्रेरणादायी

‘सिद्धिविनायक’ची कॅशलेस सेवा प्रेरणादायी

सिद्धिविनायक पतसंस्थेच्या १७व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी काका कोयटे बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष वासुदेव काळे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब कोकरे, अनिल कुलकर्णी, मनजिंतसिंग बतरा आदी उपस्थित होते. पतसंस्थेचे सोमवारी मार्केट यार्ड येथील जागेत स्थलांतर करण्यात आले.

कोयटे म्हणाले, तालुक्यातील पतसंस्थांना फेडरेशनच्या माध्यमातून मदत केली जात आहे. त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. सिद्धिविनायक पतसंस्थेने अनेक नवनवीन उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळत आहे.

वासुदेव काळे यांनी संस्थेच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. कोरोना काळातही पतसंस्थेने व्यवसाय वाढविला व खातेदारांना घरपोच सेवा दिली, असे ते म्हणाले.

प्रारंभी प्रास्तविक सचिन जोशी यांनी तर सूत्रसंचालन अजय चौधरी यांनी केले. केले. आभार संचालिका वर्षा जोशी यांनी मानले. यावेळी पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Siddhivinayak's cashless service is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.