नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 08:17 PM2018-02-26T20:17:11+5:302018-02-26T20:19:53+5:30

अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला.

The silence of the Gross Telly community on the District Collectorate | नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल तेली समाजाचा मूकमोर्चा

अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील पाच वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करणारा व त्यास पाठिशी घालणा-या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा सकल तेली समाजातर्फे तेलीखुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतला.
दुपारी एक वाजेच्या सुमारास तेलीखुंट येथे समाजबांधव जमल्यास सुरुवात झाली. तेलीखुंटमधून निघून शहरातील मुख्य बाजारपेठांतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या व्यासपीठावर काही काळे वस्त्र परिधान केलेल्या मुलींची भाषणे झाली. तसेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व महापौर सुरेखा कदम यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यावेळी संध्या मेढे, अ‍ॅड. अनुराधा येवले आदी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अभय महाजन यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पीडित मुलीवर अत्याचार करणा-यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी पीडितेच्या वडिलांवरच दबाव आणला जात आहे. तेली समाजाचे नेते अण्णा चौधरी व महेश चौधरी यांच्या मदतीने जळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. ही घटना सुसंस्कृत महाराष्ट्राला संतापजनक व चीड आणणारी आहे. आशा प्रवृत्तींच्या विरुद्ध कायद्यात दुरुस्ती करून अत्याचार करणा-यास फाशीची शिक्षा द्यावी.
नराधमास मदत करणारे व दबाव आणणारे यांनाही सहआरोपी करावे गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, हा खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा. नामांकित विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, पीडित मुलींच्या कुटुंबीयाला तातडीची मदत म्हणून ५ लाख रुपये द्यावेत, पीडित मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा व भविष्यात तिला शासकीय नोकरीची लेखी हमी द्यावी. मुलीला सर्व वैद्यकीय मदत मिळावी व पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे या मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिका-यांना निवेदन देताना अंजली देवकर, अश्विनी पनके, शारदा डोळसे, श्रृती पनके, नंदिनी डोळसे, धनश्री दारूणकर, प्रणिता हुलावळे, वैष्णवी काळे आदी उपस्थित होत्या.

Web Title: The silence of the Gross Telly community on the District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.